तारकासमूह (Constellation)

stars, constellation, universe-2633893.jpg

तारकासमूह (Constellation):– खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात. (A group of stars occupying a small portion of the celestial sphere is called a constellation.) काही तारकासमूहात एखाद्या प्राण्याची, वस्तूची किंवा व्यक्तीची आकृती दिसते. त्यानुसार पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे एकूण 88 भाग केले आहेत. प्राचीन पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांनी 12 सौर राशींची व भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 27 नक्षत्रांची कल्पना मांडली.

राशी (zodiac sign) :  सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे 12 समान भाग कल्पिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक भाग 300 चा आहे. या प्रत्येक भागाला राशी असे म्हणतात. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन या बारा राशी आहेत. ( Aries, Taurus, Gemini, Cancer, Leo, Virgo, Libra, Scorpio, Sagittarius, Capricorn, Aquarius and Pisces.)

नक्षत्र : चंद्र एक पृथ्वीप्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसांत पूर्ण करतो. प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र म्हणतात. 360 अंशाचे 27 समान भाग केले, तर प्रत्येक भाग सुमारे 130 20 मिनिटे येतो. 13020 मिनिटे एवढ्याभागातील तारकासमूहांतील सर्वांत तेजस्वी ताऱ्यावरून ते नक्षत्र ओळखले जाते. या ताऱ्याला योगतारा म्हणतात.

१) अश्विनी, २) भरणी, ३) कृत्तिका, ४) रोहिणी, ५) मृगशीर्ष, ६) आर्द्रा, ७) पुनर्वसू, ८) पुष्य, ९) आश्लेषा, १०) मघा, ११) पूर्वा फाल्गुनी, १२) उत्तरा फाल्गुनी, १३) हस्त, १४) चित्रा, १५) स्वाती, १६) विशाखा, १७) अनुराधा, १८) ज्येष्ठा, १९) मूळ, २०) पूर्वाषाढा, २१) उत्तराषाढा, २२) श्रवण, २३) धनिष्ठा, २४) शततारका, २५) पूर्वाभाद्रपदा, २६) उत्तराभाद्रपदा, २७) रेवती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *